बारामतीत माळी समाजाचा आज वधू-वर सूचक मेळावा
वडगाव निंबाळकर, ता. १८ : बारामती शहरात गुरुवारी (ता. १९) माळी समाजाच्या वतीने मोफत वधू- वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले आहे. समाजातील उपवर-उपवधूंसह विधवा, विधुर आणि घटस्फोटितांसाठी हा मेळावा खुला असून, विवाह जुळवणीसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा उद्देश आहे.
शहरातील जुना मोरगाव रस्ता परिसरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे हा मेळावा सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडणार आहे. याबाबतची माहिती राजाभाऊ चिंचकर, विलास कणसे पाटील, तसेच वडगाव निंबाळकर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हिरवे यांनी दिली.
या मेळाव्यासाठी कोणतीही प्रवेश फी अथवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नसून, संपूर्ण आयोजन मोफत स्वरूपात केले आहे. समाजातील इच्छुकांनी आपला बायोडाटा, अलीकडील फोटो व इतर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन विजय हिरवे यांनी केले आहे. समाजातील विवाह इच्छुकांना एकत्र आणून योग्य जुळणी घडवून आणण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

