कोऱ्हाळे गाव बंद

कोऱ्हाळे गाव बंद

Published on

वडगाव निंबाळकर, ता. २३ : कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (ता. २३) बंद पाळण्यात आला. भिगवण (ता. इंदापूर) येथे हिंदू मुलीला पळवून नेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवून तीव्र भावना व्यक्त केल्या. गावातील प्रमुख चौकात लावण्यात आलेल्या फलकावर ‘कोऱ्हाळे बंद’ असा स्पष्ट उल्लेख करत शासनाने ‘लव्ह जिहाद’ संदर्भातील कायदा त्वरित पारित करावा, तसेच संबंधित प्रकरणातील पीडितेला तत्काळ न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. सकाळपासूनच गावातील सर्व दुकाने, व्यापारी आस्थापने व इतर व्यवहार पूर्णतः बंद ठेवून ग्रामस्थांनी निषेध नोंदवला. या बंद दरम्यान गावात शांततेचे वातावरण होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पातळीवर दक्षता घेण्यात आली होती.

Marathi News Esakal
www.esakal.com