वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीला ‘महाआवास’मध्ये द्वितीय पुरस्कार

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीला 
‘महाआवास’मध्ये द्वितीय पुरस्कार
Published on

वडगाव निंबाळकर, ता. १० : महाआवास अभियान २०२३-२४ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल वडगाव निंबाळकर (ता. बारामती) ग्रामपंचायतीला जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभियानात पात्र लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करून देणे आणि योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सुनील ढोले, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद किर्वे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र शिंदे, ग्रामरोजगार सहाय्यक नीलेश साळवे, सोनाली खोडके उपस्थित होते. या यशाबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.
- सुनील ढोले, सरपंच, वडगाव निंबाळकर

03024

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com