

वडगाव निंबाळकर, ता. १ : बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
मोरगाव (ता. बारामती) येथील निसर्ग संगीत कृषी पर्यटन येथे झालेल्या वार्षिक बैठकीत या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, ॲड. गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, मावळते अध्यक्ष सोमनाथ भिले, कल्याण पाचांगणे, हेमंत गडकरी, मनोहर तावरे, विनोद पवार, महेश जगताप, विजय गोलांडे, रामभाऊ जगताप, संगीता भापकर उपस्थित होते. सचिव चिंतामणी क्षीरसागर यांनी विषय वाचन केले. यावेळी पत्रकार संघाचे सभासद उपस्थित होते. ग्रामीण पत्रकारितेचा आवाज बुलंद करण्यासाठी व पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी नवी कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उपाध्यक्ष कल्याण पाचांगणे यांनी मनोगत व्यक्त करत संघटनेच्या प्रगतीबाबत आशावाद व्यक्त केला.
नवनिर्वाचित कार्यकारिणी :
अध्यक्ष : युवराज खोमणे, कार्याध्यक्ष : राजेश वाघ, उपाध्यक्ष : सुनील जाधव, कल्याण पाचांगणे, सचिव : गजानन हगवणे, सहसचिव : चिंतामणी क्षीरसागर, खजिनदार : विजय गोलांडे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती : महेश जगताप, कायदेशीर सल्लागार : ॲड. गणेश आळंदीकर, महिला प्रतिनिधी : संगीता भापकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.