पावसामुळे सुखावला वडापुरीमध्ये शेतकरी

पावसामुळे सुखावला वडापुरीमध्ये शेतकरी

वडापुरी, ता.४ : वडापुरी (ता. इंदापूर) परिसरात पाच वाजता वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडासह मंगळवारी (ता.४) अचानक पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले. यामुळे शेतकरी सुखावला आहे. कारण या पावसामुळे शेतातील असलेल्या पिकांना देण्यात येणाऱ्या पाण्याची पाळी वाचली आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या अगोदरची कामे संपूर्णपणे ठेवली आहेत. मात्र पाऊस कधी पडतोय याचीच वाट पाहत बसलेला शेतकरी सुखावला आहे.
पावसाने चार जूनला सुरुवात केल्याने यावर्षी पावसाळा चांगला जाईल, पावसाच्या पाण्यामुळे विहिरींची पातळी वाढेल व खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पदरात पडेल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

02113

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com