निर्यातक्षम भारतीय ज्वारीला ग्लोबल बनविणार

निर्यातक्षम भारतीय ज्वारीला ग्लोबल बनविणार
Published on

वडापुरी, ता. २५ : ‘‘शेतकरी जगाचा अन्नदाता आहे. तो सुखी तर जग सुखी रहाणार आहे. भारतीय आहारात आरोग्यदायी ज्वारीला खूप महत्व आहे.तिचे आहारातील महत्व लक्षात घेऊन निर्यातक्षम भारतीय ज्वारीला ग्लोबल करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करणार आहे,’’ अशी ग्वाही अमेरिकेतील सोरघम युनायटेड फाउंडेशनचे सीईओ नेट ब्लूम यांनी दिली आहे.
वडापुरी (ता. इंदापूर) येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सोरगम युनायटेड फाउंडेशन, समृद्धी ॲग्रो ग्रुप व कृषी विभागातर्फे ज्वारीला ग्लोबल करण्याचे नियोजन करण्यासाठी रामवाडी-वडापुरी येथे शेतकऱ्यांसाठी नुकतीच एक दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी ब्लूम बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांनी बाजारपेठेत जे विकते ते पिकविण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे स्थानिक भारतीय ज्वारीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबल बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

अबुधाबी येथील गुंतवणूकदार श्रीमती ईव्ह यांनी शेतकऱ्यांच्या अडी अडचणी कशा पद्धतीने सोडविता येतील याची माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना ज्वारी पिकातील नवीन तंत्रज्ञानासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक करणार असल्याचे सूतोवाच दिले.
यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर म्हणाले की, इंदापूर तालुका हा एकेकाळी ज्वारीचे आगार होता. त्यामुळे या पुढील काळात ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन करून हा प्रक्रिया व्यवसाय वाढवला जाईल.

भरड धान्यांचे महत्त्व लक्षात घेता देशात या खालील क्षेत्र वाढले पाहिजे. यासाठी एकत्र येऊन निविष्ठा खरेदी, विक्री, प्रक्रिया अशी वेगवेगळी कामे केली पाहिजेत, यासाठी वेगवेगळे प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था निश्चित मदत करेल.
डॉ. बामदेव त्रिपाठी, संचालक सोरघम युनायटेड फाउंडेशन

यावेळी समृद्धी ॲग्रो ग्रुप कंपनीचे संचालक तात्यासाहेब फडतरे, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांनी ज्वारी पिकासाठी राबविण्यात येणारे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान व विविध प्रकारच्या योजना या विषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी वडापुरी,रामवाडी,बावडा, सुरवड, वकिलवस्ती, झगडेवाडी परिसरातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


02465

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com