इंदापूरमध्ये समृद्ध पंचायतराज अभियानास वेग
वडापुरी, ता. २९ : शासनाच्या वतीने ग्रामीण विकासाला नवे बळ देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी इंदापूर तालुक्यात वेगाने सुरू झाली आहे. वडापुरी (ता. इंदापूर) गावातील नागरिकांनी या सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी दादासाहेब वाघ यांनी केले आहे.
या अभियानाबाबत तालुक्यातील ग्रामपंचायतींना सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग प्रशासनाने स्पष्ट केल्याने वडापुरी गावातील नागरिकांनी थकबाकीत ५० टक्के सवलत घ्यावी असे देखील ग्रामपंचायत अधिकारी दादासाहेब वाघ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी सवलत देण्यात येत आहे. यामध्ये एक रकमेकरिता निवासी मालमत्ता कर आणि ऑल कराची थकबाकी वसुलीवर सवलत देणे (घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्तीकर), एक एप्रिल २०२५ पूर्वीच्या थकबाकीच्या पन्नास टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या दिलेल्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास मूळ थकबाकीच्या रकमेत ५० टक्के सवलत राहील. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत असून औद्योगिक वाणिज्यक, इतर मालमत्ता करासाठी लागू नसल्याची माहिती दादासाहेब वाघ यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

