इंदापूर तालुक्यात ज्वारीच्या क्षेत्रात घट

इंदापूर तालुक्यात ज्वारीच्या क्षेत्रात घट

Published on

वडापुरी, ता. ३ : गेल्या पाच ते १० वर्षापूर्वी इंदापूर तालुका हा ज्वारीचा तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र, भुसार पिकांमध्ये परवडत नसल्याने शेतकरी दुसऱ्या पिकांकडे व फळबागांकडे वळाल्यामुळे ज्वारीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आले.
इंदापूर तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या ज्वारी काही ठिकाणी काढणीस आल्या असून, शेतकरी स्वतः किंवा मजुरांकडून ज्वारी पिके काढत असताना दिसत आहेत. मात्र, ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याने यंदा उत्पादन देखील कमी निघणार आहे. त्यामुळे ज्वारीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर तालुक्यात ३२८८ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी २६०७ हेक्टर एवढीच म्हणजेच ७९ टक्केच ज्वारीची पेरणी झाली आहे.

ज्वारीचे दर खालीलप्रमाणे.
मालदांडी ज्वारी- पाच ते सहा रुपये क्विंटल.
दगडी ज्वारी- चार ते पाच हजार रुपये क्विंटल.
हायब्रीड ज्वारी- साडे तीन ते चार हजार रुपये क्विंटल.

03000

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com