बेडसिंग, वडापुरी परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत घट
वडापुरी, ता. १२ : गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच इंदापूर तालुक्यात पाऊस पडला होता, त्यामुळे पाझर तलावांसह विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होती. मात्र, गेल्या महिन्यापासून बेडसिंग, वडापुरी परिसरातील विहिरींच्या पातळीत घट होत आहे.
रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे सुद्धा जिकिरीचे झाले असून शेतकरी रोज एक दोन सारे का होईना हळू हळू पिकांना पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत.
इंदापूर तालुक्यात रब्बी हंगामातील पिके जगविण्याकडे शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. विहिरींची पाणी पातळी घटत असल्याने पिके जगवावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
वडापुरी, बेडसिंग, गलांडवाडी नं. ०२ विठ्ठलवाडी, पंधारवडी, लाखेवाडी,रेडणी या परिसरात विहिरींच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असताना पहावयास मिळत आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिके चांगली आली आहेत. ती जगविण्यासाठी पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. मात्र, उन्हाळ्याच्या अगोदरच विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट होत असल्याने चिंता वाढली आहे.
- दत्तात्रेय मगर, शेतकरी
03086
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

