उसातील हरभरा इंदापूरमध्ये जोमात

उसातील हरभरा इंदापूरमध्ये जोमात

Published on

वडापुरी, ता. २२ : इंदापूर तालुक्यात चालू रब्बी हंगामातील हरभरा पीक हे सध्या फुलोरात, दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून घेतलेले हरभरा पीक जोमात आले आहे.

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हरभरा पिकाची मदत होते. त्यामुळे उपलब्ध क्षेत्रावर हरभरा पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असतो. घाटे पोखरणाऱ्या अळीचा वेळेवर बंदोबस्त केल्यास हरभरा पिकापासून शेतकऱ्यांना चांगली आर्थिक प्राप्ती होते, असा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी कीटकनाशक औषधांच्या फवारण्या केल्या आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून हरभऱ्यास बाजारामध्ये
चांगला बाजारभाव मिळत आहे.
ऊस पिकामध्ये हरभऱ्याचे आंतरपीक फायदेशीर ठरत असल्याचे पंधारवाडी येथील शेतकरी सचिन भोसले यांनी सांगितले. सध्या गावोगावच्या आठवडे बाजारामध्ये हरभऱ्याचे डहाळे विक्रीला येत आहेत. त्यास चांगला बाजारभाव मिळत आहे.

03106

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com