साखर उद्योगासमोरील अडचणी सोडवा : पाटील

साखर उद्योगासमोरील अडचणी सोडवा : पाटील

Published on

वडापुरी, ता. १ : राज्यातील साखर उद्योग सध्या अडचणीत आहे. चालू गळीत हंगामातील सुमारे ४५०० कोटी रुपयांची थकबाकी ऊस उत्पादन शेतकऱ्यांना अदा करण्यासह विविध अडचणींवर मार्ग काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासंदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बुधवारी बैठकीचे आयोजन केले आहे. अडचणी सोडविण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी केले आहे.
दरम्यान, यावेळी पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागाने साखर कारखान्यांसाठी पाणीपट्टी दरात मोठी वाढ केली आहे. वाढीव दरानुसार आता साखर कारखान्यांना प्रतिघनमीटर पाणीपट्टीची मोठी रक्कम द्यावी लागणार आहे, या  वाढीव पाणीपट्टीमुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या साखर उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com