हार्वेस्टरने गहू काढण्यास इंदापूर तालुक्यामध्ये वेग

हार्वेस्टरने गहू काढण्यास इंदापूर तालुक्यामध्ये वेग

Published on

वडापुरी, ता. ४ : इंदापूर तालुक्यातील गव्हाचे पीक परिपक्व अवस्थेत झाले आहे. त्यामुळे मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी हार्वेस्टरच्या साह्याने गहू काढणी करीत आहे.
सध्या मजुराची टंचाई मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. त्यामुळे पंजाबहून गव्हाच्या काढणीसाठी हार्वेस्टर मागविले आहेत. सध्या तालुक्यात गहू काढणीला वेग आला आहे.
सध्या एका एकराला गहू काढण्यासाठी हार्वेस्टरचा अडीच हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत दर आहे. त्यामुळे हार्वेस्टरला मोठी मागणी वाढत आहे कारण मजरांकडून गहू काढणे, मळणी करणे, इत्यादी खर्चाचा विचार करता मजुरीचा दर परवडत नाही. हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू करण्यासाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती असल्याचे इंदापूर तालुक्यात पहावयास मिळत आहे.
शेटफळ हवेली, अवसरी, बेडशिंग, वडापुरी, पंधारवाडी, रेडणी, लाखेवाडी, बाभूळगाव, कांदलगाव, हिंगणगाव, विठ्ठल वाडी, गलांडवाडी नं २, शहाजीनगर परिसरात गहू काढणीला वेग आला आहे.

03125

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com