उन्हाच्या तीव्रतेपासून ड्रॅगन फ्रूटचे संरक्षण
वडापुरी, ता. १९ : इंदापूर तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून ड्रॅगन फ्रूट बागेचे संरक्षण करण्यासाठी अभंगवस्ती- वडापुरी येथील शेतकरी सुभाष हेगडे यांनी संपूर्ण बागेवर पांढऱ्या जाळीचे आच्छादन केले आहे. या प्रयोगामुळे फळबागेचे नुकसान टळत आहे. तसेच पाण्यातही मोठी बचत होत आहे.
कडक उन्हामुळे ड्रॅगन फ्रूटची झाडे पिवळी पडतात आणि सावलीअभावी हिरवेपणा कमी होतो. याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. हे टाळण्यासाठी हेगडे यांनी एक एकर क्षेत्रावर लोखंडी खांब, तार आणि पांढऱ्या नेटचा वापर केला आहे. यासाठी त्यांना मजुरीसह सुमारे दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला आहे.
ड्रॅगन फ्रूटच्या बागेला नेटचे संरक्षण दिले नाही तर काडी तयार होत नाही आणि उत्पादनात घट येते. नेटमुळे बागा हिरव्यागार राहतात आणि पाण्याचीही बचत होते. इतर शेतकऱ्यांनीही उन्हाळ्यात पिकांच्या संरक्षणासाठी अशा नेटचा वापर करावा.
- सुभाष हेगडे, ड्रॅगन फ्रूटचे उत्पादक
03145
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

