

वडापुरी, ता. १४ : शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथे अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडल्याने प्रणव नितीन चव्हाण या सहा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नितीन बाळू चव्हाण (वय ३४, रा. शेटफळ पवेली, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ट्रॅक्टरचालक मदन काळे (रा. शेटफळ पवेली, ता. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, न्यायाच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी मृतदेहासह पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या दुर्घटनेनंतर अवैध मुरूम माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिस हवालदार पवार व सहाय्यक फौजदार माने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.