फाइव्ह स्टार हॉटेलात जेवण देण्याची पैज

फाइव्ह स्टार हॉटेलात जेवण देण्याची पैज

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. बारामतीचा गड चार जूनपर्यंत कोण राखणार? याबाबत राजगड तालुक्यातील गावावांतील पारावर गप्पा रंगत असून, अनेक वेगवेगळ्या पैजा सुद्धा लागल्या आहेत. यामुळे निकालाबाबत उत्कंठा शिगेला पोचली आहे.
- मनोज कुंभार, वेल्हे


राजगड तालुक्यामध्ये पारावर तसेच विविध गावांमधील आनंदाचे क्षण असलेल्या लग्न समारंभ, वास्तुशांती, पूजा यांच्यासह दुःखाचे क्षण असलेल्या अंत्यविधी, दहावे, तेरावे, वर्षश्राद्ध अशा कार्यक्रमांमध्ये तालुक्यामध्ये आपापले उमेदवार विजयी होतील, असे छाती ठोक सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी लहान मोठा पैजा लागल्या आहे. यामध्ये ग्रामीण धाब्यावरील जेवणासह मुंबई पुण्यातील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण, शेतकऱ्यांमध्ये शेतामध्ये दहा दिवस फुकट कामाला येईल तर तालुक्यात परत फिरणार नाही, राजकारण सोडून देईल अशा अजब गजब पैजा लागल्या आहेत. यामुळे गप्पांचे फड रंगत असून निकालाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

तालुक्याच्या पूर्व भागांमधील आंबवणे, करंजावणे, मांगदरी, वांगणी, वांगणीवाडी, निगडे बुद्रुक, मार्गासनी गावांमध्ये समसमान तुतारी व घड्याळ चालण्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. परंतु सोंडे परिसरातील हिरोजी सोंडे, सरपाले सोंडे, कारले सोंडे, सोंडे माथना, वडगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात तुतारीला मतदान झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तर राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बारागाव मावळ परिसरात सुद्धा तुतारीस साथ दिल्याची चर्चा आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या वेल्हे, आडवली या गावामध्ये घड्याळाची टिकटिक जास्त वाजण्याची शक्यता मतदारांनी व्यक्त केली. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अठरा गाव मावळ परिसरामध्ये काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे तुतारीचा आवाज धुमणार असल्याची शक्यता बहुतांश ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तालुक्याचा उत्तर भागातील पानशेत परिसरामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मते तर काही गावांमध्ये तुतारी अधिक चालण्याची चर्चा होती.

यावर चर्चा
- खासदाराकडून मूलभूत प्रश्‍न सुटले नाहीत
- अजित पवार समस्या सोडविणार यावर विश्‍वास
- महागाई, पक्षफोडाफोडीबाबत नरेंद्र मोदींबाबत रोष
- ‘भटकती आत्मा’ या टीकेमुळे नागरिकांत संताप
- राष्ट्रवादीने वाटप केलेल्या पैशाची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com