जांभूळ विक्रीतून ९० हजार रुपयांची उलाढाल

जांभूळ विक्रीतून ९० हजार रुपयांची उलाढाल

Published on

वेल्हे, २ : जांभूळ विक्रीचा सामाजिक उपक्रम राबवत ज्ञान प्रबोधिनीच्या स्त्री शक्ती ग्रामीण विभागाने तब्ब्ल ३७३ किलो जांभूळ विक्री केली केली आहे. यातून ९० हजारांची उलाढाल झाली. यामुळे आदिवासी बांधवांना मोठा फायदा झाला आहे, अशी माहिती ज्ञान प्रबोधनीच्या कार्यकर्त्या सुवर्णा गोखले यांनी दिली.

वेल्हे तालुक्यात जांभळे काढणे हे बहुतेक ठिकाणी कातकरी समाजाचे काम करतो. उन्हाळा संपताना येणारी जांभळे त्यांना रोजगार मिळवून देतात.यामुळे त्यांना फायदा होतो. खात्रीचा रोजगार मिळाला तर स्थलांतर थांबते, मुलांचे शिक्षण सुरू रहाते. या उद्देशाने मागील दोन वर्षे जांभूळ विक्री करत आहोत. ज्ञान प्रबोधिनीचे हे यंदाचे तिसरे वर्ष आहे, अे गोखले यांनी सांगितले.

यंदा विक्री केलेल्या ३७३ किलोपैकी १८९ किलो जांभळे १० दिवसात पाच कातकरी कुटुंबांकडून खरेदी केली. पुण्यात विकली गेली. चोख वजन करुन वेळेत खर्चासाठी रोख रक्कम मिळाल्याने त्या कुटुंबांना मोठी मदत झाली. या उपक्रमाने आदिवासी बांधवांचा विश्वास वाढला असून चांगला बाजारभाव मिळावा म्हणून पँकिंग कसे करायचे, वजन कसे करायचे हे वेल्हे निवासातल्या मुलींनी वस्तीवर जाऊन त्यांच्या सोबत करून शिकवले.

02479

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.