राजगड तालुका भाजपच्या 
अध्यक्षांवर कार्यकर्ते नाराज

राजगड तालुका भाजपच्या अध्यक्षांवर कार्यकर्ते नाराज

Published on

वेल्हे, ता. १ : राजगड तालुक्यातील भाजपचे एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष आनंद देशमाने यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप केला असून, त्याला कंटाळून सामूहिक राजीनामे देणार असल्याचे लेखी निवेदन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व भोर विधानसभा निवडणूक प्रभारी किरण दगडे पाटील यांच्याकडे दिले आहे, अशी माहिती माजी तालुकाध्यक्ष रवींद्र दसवडकर व किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनकर मळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या पत्रकावर रवींद्र दसवडकर, दिनकर मळेकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजू रेणुसे, युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसले, युवा मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी शुभम बेलदरे, सचिन भरम, प्रशांत शिळीमकर, रोहिदास करंजकर, रोहित शिळीमकर, सुनील बोरगे, राजाराम लिमण यांच्यासह पस्तीस ते चाळीस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सह्या केल्या आहेत.

माझ्यावर केलेले आरोप खोटे असून, ते राजकीय आकसापोटी केलेले आहेत. तालुक्यातील भाजप पक्षातील 75 टक्के कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत.
- आनंद देशमाने, अध्यक्ष, वेल्हे तालुका भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.