आडवली येथील 
विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

आडवली येथील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

Published on

वेल्हे, ता. २ : आडवली (ता. राजगड) येथे सायबेज आशा संस्थेच्यावतीने आंब्यांची झाडे व शैक्षणिक साहित्य वाटप केले.
सायबेज सॉफ्टवेअर प्रा लि, या आयटी क्षेत्रातील कंपनीच्या सीएसआर अंतर्गत सायबेजआशा ट्रस्ट ही संस्था २००५ पासून ग्रामविकासाची कामे करत आहे, संस्थेने २०१७ मध्ये या योजनेअंतर्गत वेल्हे आणि भोर तालुक्यातील ३६ गावे घेतली आहेत. या गावांमध्ये मूलभूत सुविधा विकासाचे आणि आधुनिक व सुधारित पद्धतीच्या शेतीचे उपक्रम संस्थेमार्फत केले जात आहेत. संस्थेने दत्तक घेतलेल्या वेल्हे तालुक्यातील आडवली गावामधील जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य दप्तर वाटप व ग्रामस्थांसाठी आंब्याच्या झाडांचे वाटप केले.

याप्रसंगी सायबेजआशा संस्थेचे प्रतिनिधी, सायबेज कंपनीचे २० इंजिनिअर स्वयंसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते मोहन काटकर, बाळासाहेब गायकवाड, नथू इंगुळकर, अरविंद काटकर, चंद्रकांत काटकर यांसह शिक्षक, पालक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.