

वेल्हे, ता. ३० ः रयतेचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या ९९ दिवसांच्या कैदेतून १७ ऑगस्ट १६६६ रोजी हातावर तुरी देत राजगडच्या दिशेने गरुड झेप घेतली. या ऐतिहासिक घटनेनिमित्त आयोजित केलेल्या पायी आग्रा ते राजगड मोहिमेचा गुरुवारी (ता.२९) रोजी राजगड किल्ल्यावर समारोप करण्यात आला.
इतिहासाला कलाटणी देणारी विशेषतः मराठ्यांच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या घटनेनिमित्त १७ ऑगस्ट रोजी शिवचातुर्य दिन आयोजित करण्यात येतो. तसेच ‘गरुड झेप मोहिमे’ची सांगता कार्यक्रम किल्ले राजगडावर आयोजित केला होता. ३५७ व्या वर्धापन दिनानिमित्त आग्रा ते राजगड १,२५३ किलोमीटर पायी मोहिमेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती गरुड झेप मोहिमेचे संस्थापक मारुती गोळे यांनी दिली. यंदाचे हे पाचवे वर्ष होते.
समारोपानिमित्त राजगडावरील शिवकालीन श्री पद्मावती मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक मारुती आबा गोळे, अध्यक्ष राकेश विधाते, दुर्गराज राजगड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोरक्ष शिर्के, उपाध्यक्ष शंकर रेणुसे अण्णा रेणुसे, अंकुश खुळे, राजाराम रेणुसे, अण्णा रेणुसे, प्रकाश भोसले, प्रकाश केदारी, भारत पाटील, राजू दर्कुंडे, अमोल देवकर, राजेश महानगरे, जुगल राठी, श्रीहरी मारणे, शंभु सूर्य मर्दानी आखाड्याचे कार्यकर्ते अमोल ऊनेचा, अॅड. प्रशांत सलेकर, शेखर जावळकर, मनीष जवळकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.