

वेल्हे, ता. ३ : तोरणागड व राजगडसह (ता.राजगड) परिसरामध्ये शिवकालीन देवतांच्या मंदिरात नवरात्र उत्सवास मोठ्या श्रद्धेने सुरुवात झाली आहे.
किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या स्वयंभू मेंगाई देवी परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधलेल्या तोरणागडावरील मुख्य मंदिर असलेल्या मेंगाई माता मंदिर, तोरणजाई मंदिर, वाळंजाई माता या तीन ठिकाणी तोरणा गडावर घटस्थापना केली गेली.
दरम्यान येथील स्थानिक युवकांनी घटस्थापने पूर्वी संपूर्ण किल्ल्याची स्वच्छता करून परिसर फुलांनी सजविलाल्याची माहिती स्थानिक युवक कार्यकर्ते गोरक्ष भुरुक यांनी दिली.
स्वराज्याचा कारभार पाहिलेल्या राजगडावरील पद्मावती माचीवरील शिवकालीन पद्मावती देवी व सुवेळा माचीवरील श्री काळेश्वरी देवीची घटस्थापना करण्यात आली. यावेळी पुरातत्त्व विभागाचे पवन साखरे, विशाल पिलावरे तर स्थानिक सुनील गुंड ,आरती नलावडे, योगेश नलावडे उपस्थित होते.
देवस्थान ट्रस्टकडून तहसील कार्यालय ट्रेझरी मध्ये असलेले शिवकालीन दागिने नायब तहसीलदार मयूर बनसोडे यांच्या हस्ते स्वीकारण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे प्रकाश पवार, आनंद देशमाने, सुनील राजीवडे, संतोष मोरे, विकास गायखे, संजय पवार, अनिल पवार, रामभाऊ राजीवडे, कैलास कदम, पुजारी ज्ञानेश्वर वेगरे, प्रमोद भोरेकर, बंडू कदम ,विलास पांगारे आदी उपस्थित होते.
शिरकोली येथील शिवकालीन शिरकाई देवी मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती विश्वस्त अमोल पडवळ यांनी दिली. आंबवणे येथील जानुबाई मंदिर, ओसाडे येथील ओसडजाई देवी, निगडे मोसे येथील वाघजाई, आंबेड येथील काळुबाई, तालुक्यातील सर्व गावांमध्ये देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली.
02674
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.