कानंद धनगरवस्ती येथे आगीमध्ये संसार खाक

कानंद धनगरवस्ती येथे आगीमध्ये संसार खाक

Published on

वेल्हे, ता.१६ : गुंजवणी धरण खोऱ्यातील दुर्गम कानंद, धनगरवस्ती (ता.राजगड) येथील लागलेल्या आगीमध्ये लक्ष्मण नागू जानकर यांचे घर जळून खाक झाले. ही घटना शनिवारी (ता.१५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आगीमुळे घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली आहे.

वणव्यामुळे घराला आग लागली असल्याची माहिती येथील पोलिस पाटील संजय कडू व ग्रामस्थांनी यांनी दिली आहे. आग लागली त्यावेळेस जानकर हे शेतामध्ये गेले होते तर त्यांची पत्नी व मुलगा कामानिमित्त पुणे शहरांमध्ये गेले होते. वणव्यामुळे आगीची दाहकता एवढी मोठी होती की काही मिनिटांमध्येच घरामधील असणारे साहित्य जळून खास झाले. दरम्यान, घटनास्थळी रविवारी (ता.१६) तलाठी अस्मिता चांगले यांच्यासह पोलीस पाटील संजय कडू यांनी भेट दिली व पंचनामा केला असता. घरामधील साहित्य व रोकड मिळून सुमारे तीन लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे चांगले यांनी सांगितले.
02880

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com