प्रार्थनास्थळ हल्लाप्रकरणी १७ जणांना न्यायालयीन कोठडी
वेल्हे, ता. ४ : वादग्रस्त स्टेटस मोबाईलवर ठेवल्याने जमावाकडून साखर (ता. राजगड) येथील प्रार्थनास्थळावर रविवारी (ता. २)रात्री हल्ला करत वेल्हे पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या १७ जणांना न्यायालयाने १७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी ३० आरोपी निष्पन्न करून गुन्हा दाखल केला आहे. त्यातील १७ जणांना अटक केली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या देखरेखीखाली या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध वेल्हे पोलिस घेत आहेत. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ म्हणाले, ‘‘अटक केलेल्या १७ जणांना सोमवारी (ता. ३) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या साखर गावातील अल्पवयीनवर वेल्हे पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

