राजगड तालुक्यातील २२६ कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान

राजगड तालुक्यातील २२६ 
कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान
Published on

वेल्हे, ता. १७ ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांची २६ वर्षांहून अधिक काळ कर्मभूमी राहिलेल्या राजगड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग महत्त्वाचा आहे,’’ असे प्रतिपादन आमदार शंकर मांडेकर यांनी केले.

राजगड तालुक्यातील पंचायत समितीअंतर्गत २२६ अधिकारी व कर्मचारी गुणगौरव पुरस्काराचे वितरण समारंभ रविवारी (ता.९) कोंढावळे बुद्रुक येथे झाला. या वेळी मांडेकर बोलत होते. मांडेकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांच्या या ऐतिहासिक भूमीची सेवा करण्याची संधी तुम्हा सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून मला मिळाली आहे. या संधीचे सोने करून छत्रपती शिवरायांबद्दल असणारे प्रेम, आस्था प्रत्येकाने आपापल्या कार्यातून दाखवून तळागाळातील शेवटच्या वंचित घटकापर्यंत सरकारच्या विविध योजना पोहोचवणे गरजेचे आहे.’’

या वेळी अमोल नलावडे, किरण राऊत, संदीप खुटवड, पंकज शेळके, राजकुमार बामणे, संगीता जेधे, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, अशोक सरपाले, शंकर रेणुसे, बाबू गोरड, भरत चोरघे, संतोष डांगे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये शिक्षण विभागातील १०५, एकात्मिक बाल विकास प्रकल्प १८, प्रशासनातील २३, आरोग्य विभागातील ३३, ग्रामसेवक १६, संगणक परिचारक ४, समूह संसाधन व्यक्ती ५, माध्यमिक शिक्षक ११, शिपाई ११ असे मिळून एकूण २२६ पंचायत समितीअंतर्गत तालुकास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अमोल नलावडे आदी पदाधिकाऱ्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com