

वेल्हे, ता. १४ : राजगड तालुक्यातील वांगणीवाडी गावातील पाच पाणंद रस्ते खुले करण्यास तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांना गुरुवार (ता. १३) यश आले. जेसीबी, पोकलेनच्या सुमारे आठ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्ते खुले करण्याचे काम सुरू असून जवळपास तीनशेहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र शासनाने शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत राजगड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतामध्ये जाण्यासाठी अनेक ठिकाणचे पाणंद रस्ते खुले करण्याचे काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. त्यातच वांगणीवाडी गावातील अनेक दिवसापासून पाणंद रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी, शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर आदी यंत्र सामग्री नेण्यासाठी व उत्पादित केलेला शेतीमाल घरापर्यंत आणण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी अनेक दिवसांपासून गावातील ग्रामस्थ त्रस्त होते. यातूनच गावामध्ये लहान मोठे वाद निर्माण होत होते यातून एकमेकांचे शेतांकडे जाण्याचे मार्ग बंद होत असल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. मात्र राजगड तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांच्या प्रयत्नांतून गावामध्ये पाच ठिकाणचे पाणंद रस्ते गुरुवारी (ता. १३) जेसीबी व पोकलेनच्या साह्याने खुले करण्याचे काम सुरू केले.
यावेळी ग्रामसेविका तोशिबा आरसुले, वांगणीवाडीच्या सरपंच मनीषा अंकुश चोरघे, मंडलाधिकारी अजय केंद्रे, तलाठी कंक, गणेश चोरघे, माऊली चोरघे, स्वप्नील बोबडे, साहेबराव चोरघे, सचिन मालुसरे, किरण वाडघरे, सतीश बिरामणे, सुनील बिरामणे, शंकर वाडघरे, विष्णू जेधे, वैभव आल्हाट आदी उपस्थित होते.
जेसीबीच्या साहाय्याने वाटेतील अडचणी दूर करण्यात येणार असून अनेक ठिकाणी अरुंद रस्ते व अतिक्रमणांमुळे पाणंद रस्त्याकडे जाणारे मार्ग बंद झाले होते. त्याचा मार्ग मोकळा झाला होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यामध्ये पांडुरंग मंदिर ते आखर लांबी, पांडुरंग मंदिर ते गाढवे वस्ती व चव्हाण आळी ते गडशिंगी विहीर माजी सभापती सविता वाडघरे यांचे घर ते वळती पांदण, संत रोहिदास चौक ते चांभार टोकडं अशा आठ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्ते खुले केल्याने येथील ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.