वीस बस थांब्याचे जावडेकरां हस्ते लोकार्पण

वीस बस थांब्याचे जावडेकरां हस्ते लोकार्पण
Published on

वेल्हे,ता.२५ : ‘‘विंझर (ता.राजगड) गावामध्ये शासनाच्या सर्व योजना तळागाळातील पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचवत त्याची अंमलबजावणी झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे,’’ असे प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी केले.
सांसद आदर्श ग्राम योजनेचा समारोप विंझर येथील सभा मंडपाचे भूमिपूजन करून तसेच मार्गासनी येथील बस थांब्याचे लोकार्पण खासदार जावडेकर यांच्या हस्ते रविवारी (ता.२५) पार पडला.
यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे, भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.अण्णा शिंदे, भाजपचे तालुका अध्यक्ष राजू रेणुसे, सरपंच मोनिका लिम्हण, दिनकर सरपाले, दिनकर धरपाळे, नाना साबणे, नाना राऊत, रवी दसवडकर, दिनकर मळेकर, आकाश वाडघरे, गणेश जागडे, शिवराज शेंडकर, सतीश लिम्हण, आनंद देशमाने, सुनील जागडे ,सुषमा जागडे, सुशांत भोसले, शुभम बेलदरे, विशाल वालगुडे,आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, जावडेकर यांच्या निधीतून उभारलेल्या वेल्हे ते चेलाडी मार्गावरील वीस बस थांब्यांपैकी राजगड तालुक्यातील आस्कवडी, मार्गासनी येथील बस थांब्यांचे प्रतिनिधी स्वरूपात लोकार्पण करण्यात आले.

03021

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com