शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हारपुडे

शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हारपुडे
Published on

वेल्हे, ता. ५ : राजगड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी साधू हारपुडे यांची तर उपाध्यक्षपदी सीमा महाडीक यांची बिनविरोध निवड झाली. सुप्रिया कडू यांनी अध्यक्षपदाचा व हेमंत कांबळे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर वेल्हे (ता. राजगड) येथे निवडीची प्रक्रिया नुकतीच पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संस्थेचे प्रदिप गोरड व लिपिक सर्जेराव पवार यांनी काम पाहिले. यावेळी माजी गटशिक्षणाधिकारी पोपट नलवडे, संस्थेचे सचिव युनूस शेख, संचालक वसंत हारपुडे, बाळासाहेब शेख, लक्ष्मण करंजकर, धोडिंबा जानकर, रामदास गायकवाड, संतोष उत्तरकर, संगीता हारपुडे, रोहिदास रेणुसे, सचिन कडू आदी उपस्थित होते.
निवडणुकीनंतर आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रेवणनाथ दारवटकर, माजी सभापती दिनकर सरपाले, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, आनंद देशमाने, रोहिदास शेंडकर, शंकर रेणुसे, दत्ता पानसरे, राजू झांजे आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com