टेकपोळे येथील पुरात 
दोन जनावरे गेली वाहून

टेकपोळे येथील पुरात दोन जनावरे गेली वाहून

Published on

वेल्हे, ता. ४ : पानशेत धरण खोऱ्यातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील टेकपोळे (ता. राजगड) येथील ओढ्याच्या पुरात वसंत कृष्णा बामगुडे यांची एक गाय व एक बैल, अशी दोन जनावरे वाहून गेली ‌असल्याची घटना गुरुवारी (ता. ३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
वसंत बामगुडे यांनी गावाजवळील डोंगर रानात जनावरे चारण्यासाठी सोडली होती. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने अचानक बंडाच्या ओहळाच्या ओढ्याला पुर आला. पुरात गाय व बैल वाहून गेले. वसंत बामगुडे व शेतकऱ्यांनी जनावरांचा शोध घेतला मात्र सायंकाळपर्यंत जनावरे सापडली नाही.
याबाबत राजगडचे तहसीलदार निवास ढाणे म्हणाले, ‘‘या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तलाठी, मंडलाधिकारी आपत्ती व्यवस्थापन पथक शुक्रवारी (ता. ४) सकाळपासून टेकपोळे ओढ्यापासून पानशेत धरणातील पाणवठ्यापर्यंत शोध घेतला मात्र जनावरांचा शोध लागला नाही.’’
टेकपोळेच्या सरपंच मंगल बामगुडे म्हणाल्या, ‘‘घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने ओढ्या नाल्यांना पुर आले आहेत. त्यामुळे पुरात वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई शासन निर्णयानुसार शेतकऱ्याला द्यावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com