ढोल ताशांच्या गजरात नाचणी, वरईची मशागत
वेल्हे, ता.१२ : किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी नाचणी, वरईची सामूहिक शेती ढोल ताशांच्या गजरात तसेच पारंपरिक लोकगीते गात शेतकऱ्यांसह महिलांकडून केली जाते. समाज माध्यमांवर शेती मशागतीचा व्हिडिओ प्रसारित झाल्याने तो सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या सामूहिक शेतीचे कौतुक केले आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तालुक्यामध्ये उघडीप दिल्याने पारंपरिक नाचणी वरई पिकांच्या खुरपणीला रविवारी (ता.१०) सुरुवात झाली.
राजगड तालुक्यामध्ये नाचणी, वरई मोठ्या प्रमाणात डोंगर उतारावर केली जाणारी ही शेती खऱ्या अर्थाने सेंद्रिय पद्धतीने होत असते. डोंगराच्या उतारावर पावसाळ्याच्या सुरुवातीला नाचणी वरई पिकांच्या रोपांची लागवड केली जाते. यानंतर पडत असलेल्या पावसामुळे यामध्ये गवत, झुडपे वाढली जातात. त्यानंतर जी मशागत केली जाते ती मशागत या परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात करतात. तिला खुरपणी म्हणतात. आदिवासी भाषेमध्ये याला पडकही किंवा हातारगी म्हणून संबोधले जाते. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तालुक्यामध्ये उघडीप दिल्याने पारंपरिक नाचणी वरई पिकांच्या खुरपणीला रविवारी (ता.१०) सुरुवात झाली.
यावेळी शेतकरी कैलास बोराणे, बापू गाडे, भाऊ बालगुडे, अनिल गाडे, चंद्रकांत महाडिक, बाळू सांगळे, गणपत वेगरे, सनी साबळे, दशरथ दिघे, बबन वेगरे, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या काम करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी शंकर नाना भुरुक, दीपक भोंडेकर, निवृत्ती गाडे यांनी ढोल वाजविले.
या गावांचा समावेश
राजगड तालुक्यातील किल्ले तोरणा व राजगड परिसरामधील वेल्हे, भट्टीवाघदरा, गेळगणी, अठरा गाव मावळ परिसर, बारागाव मावळ, परिसर रायगड जिल्ह्याचे हद्दीवरील तव, घोल, दापसरे, टेकपोळे, घिसर, रायंदरवाडी, एकलगाव, सिंगापूर, मोहरी या गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर या वरई, नाचणी पिकांची पेरणी केली जाते.
डोंगर उतारांवर केल्या जाणाऱ्या या शेतीमध्ये खुरपणी करताना कमी वेळामध्ये अधिक काम व्हावे व मजुरांना थकवा जाणवू नये व परिसरातील हिंसक प्राणी बाजूला जावेत या उद्देशाने मोठ्या प्रमाणात ढोल झांज ताशा व पारंपारिक गायन गायले जाते.
- शंकर नाना भुरुक, स्थानिक शेतकरी, वेल्हे
कृषी संस्कृतीचे वैभव शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या उत्सवातून दिसून येते. वेल्हे येथे सुरू पडकही उत्सव उत्साहात सुरू असून देशाचे सांस्कृतिक वैविध्यच आपल्या देशाच्या समृद्ध वारशाची खरी ओळख आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार
03155
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.