राजगडमधील शेतकऱ्यांनी समूह शेतीस प्राधान्य द्यावे
वेल्हे, ता. ३ : बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी एकत्र येत सामूहिक शेती प्राधान्य देऊन प्रगती साधावी तसेच सहकारी सोसायट्यांनी कृषी आधारित विविध व्यवसाय सुरू करून शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक रेवणनाथ दारवटकर यांनी केले.
नाबार्ड व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ संचालक दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी शेतकरी व सभासद, कर्मचारी यांचा अभ्यास दौरा नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फॉर्म प्रोडूसर कंपनीला भेट देत नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या दौऱ्यामध्ये तालुक्यातील सर्व संस्थांचे ७०० प्रशिक्षणातील सहभागी झाले होते.या ठिकाणी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यास संबोधताना दारवटकर बोलत होते.
दरम्यान, नाशिक दौऱ्यासाठी प्रस्थान होणाऱ्या गाड्यांचे पूजन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. दौऱ्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्मही शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांचे हितासाठी स्थापन केलेली कंपनी असून नाशिक जिल्ह्यातील अठरा हजार शेतकरी या कंपनीचे सभासद आहे. अभ्यास दौऱ्याच्या वेळी शेतकऱ्यांना पीक पूर्व मशागत, कापणी पश्चात सुविधा आवश्यक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन , कंपनीच्या माध्यमातून सामूहिक हित जोपासून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास कशा पद्धतीने चालतो तसेच सह्याद्री फार्मचा प्रेरणादायी प्रवास या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थितांना सहकार संचालक मंडळाची कर्तव्य, जबाबदारी, व्यवसाय विकास नियोजन, केंद्र व राज्य शासनाचे उपक्रम याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. अभ्यास दौऱ्यानंतर त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी माता, शिर्डी येथे शेतकऱ्यांना देवदर्शन घडवण्यात आले. प्रशिक्षण दौऱ्यात माजी सभापती गणपतराव पंडित, माजी उपसभापती अनंता दारवटकर, गुलाबराव रसाळ, अंकुश पासलकर, भीमाजी देवगिरीकर, यांच्यासह सर्व विकास सोसायटी संस्थांचे अध्यक्ष संचालक सभासद व सचिव सहभागी झाले होते.
03331
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

