कोंढावळे खुर्द परिसरात बिबट्याकडून शेळी ठार
वेल्हे, ता. २७ : कोंढावळे खुर्द (ता. राजगड) येथील डोंगर परिसरात राहणारे शेतकरी रामभाऊ झिलू ढेबे हे मंगळवारी (ता. २५) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या शेळ्यांच्या कळपासह जात असताना झुडपात लपलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. त्यात एक शेळी ठार झाली. आपले पशुधन वाचवण्यासाठी रामभाऊ ढेबे यांनी आरडाओरड करत बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याने आपली शिकार सोडून झाडी-झुडपात पळ काढला. हा बिबट्या साधारण १ ते २ वर्ष वयाचा आहे. या घटनेची माहिती मिळताच कोंढवळे बुद्रुकचे पोलिस पाटील उल्हास भुरुक व कोंढवळे खुर्दच्या पोलिस पाटील रेणुका शंकर खोपडे यांनी तत्काळ वनविभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले. यानंतर वनविभागाचे अधिकारी विकास निकम व विलास गाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थ संभाजी भुरुक व सुरेश ढेबे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

