राजगड तालुक्यात विविध कार्यक्रम

राजगड तालुक्यात विविध कार्यक्रम

Published on

वेल्हे, ता. २० ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजगड तालुक्यामध्ये गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऐतिहासिक किल्ले तोरणा व राजगडावर छत्रपतींच्या जयघोषाने, पारंपरिक वेशभूषेणे शिवकाळ जागा झाला होता.
तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पंचायत समितीसमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी संजय ढमाळ, माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, पंचायत समिती सदस्या सीता खुळे, आनंद देशमाने, मुख्याध्यापक भरत शेंडकर, ड्रीमलँड इंग्लिश स्कूल मालवलीच्या मुख्याध्यापिका तृप्ती शिळीमकर, संतोष मोरे, नथू गायकवाड, सुनील राजीवडे, राणी दिघे, चंद्रकांत चव्हाण, रवींद्र करंजकर आदी उपस्थित होते.
यावेळी वेल्हे येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. ड्रीमलँड इंग्लिश स्कूलमधील ज्ञानेश्वर भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रभावी पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दरम्यान, आंबवणे येथे श्री जय गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सिंहगडावरून शिवज्योत आणत त्याची मिरवणूक काढली. मालवली, करंजावणे, सोंडे कारला, वांगणीवाडी येथे किल्ल्यांवरून शिवज्योत आणत उत्साही मिरवणूक काढली. काही ठिकाणी अफजलखान वध, रायरेश्वरावरील शपथ अशा ऐतिहासिक घटनांवर आधारित नृत्यनाट्ये आणि गीते सादर करण्यात आली. तसेच, विद्यार्थ्यांनी शिवचरित्राविषयी आपली मनोगते व्यक्त केली. अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते.

03538

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com