राजगड तालुक्यात सात मार्चपासून आयोजन
वेल्हे, ता. २८ : ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १’ अंतर्गत राजगड तालुक्यात विविध ठिकाणी महसूल शिबिरांचे आयोजन सात मार्चपासून करण्यात येणार आहे. भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराच्या पूर्व तयारीसाठी शुक्रवारी (ता. २७ ) बैठकीचे आयोजन केले होती, अशी माहिती राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, तानाजी मांगडे, पंचायत समिती सदस्य संदीप खुटवड, सीता खुळे, सुवर्णा राऊत, लाला रेणुसे, अंकुश दसवडकर, आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अंबवणे येथे होणाऱ्या पहिल्या शिबिरासाठी मंडळातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित राहणार असून, प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी, अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित दिवशी शिबिरास उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार ढाणे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अर्ज स्वीकारून होणार कार्यवाही
शिबिरांदरम्यान ७/१२ उताऱ्यांतील त्रुटी दुरुस्ती, फेरफार नोंदी, वारस नोंद, जमिनींचे व्यवहार व हस्तांतरण यांची तपासणी, तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, संजय गांधी निराधार योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ‘लोकसेवा हक्क कायदा’ अंतर्गत विविध प्रमाणपत्रे व दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. अपूर्ण किंवा त्रुटी असलेली कागदपत्रे पूर्ण करण्याबाबतही संबंधितांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबिरांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
दिनांक........ मंडल........ पत्ता
७ मार्च ........ अंबवणे........ पार्वती मंगल कार्यालय, करंजावणे
१४ मार्च........ पासली........ राम मंदिर पासली
१० एप्रिल ........ पानशेत........ अनुशंकर मंगल कार्यालय, पानशेत
१७ एप्रिल........ वेल्हे ........ लक्ष्मी मंगल कार्यालय, कोंढावळे
८ मे ........ विंझर........ राज तोरणा इंग्लिश मीडियम स्कुल, विंझर
03548
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

