कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
Published on

वेल्हे, ता. २७ : ‘‘राजगड तालुक्यात जलजीवन मिशनची कामे अपूर्ण ठेवून नागरिकांना त्रास देणाऱ्या ठेकेदारांना तातडीने काळ्या यादीत टाका,’’ अशा सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वेल्हे (ता. राजगड) येथील पंचायत समिती प्रांगणात आयोजित खरीप हंगाम व पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.
राजगड तालुक्यातील खरीप नियोजन आणि पाणीटंचाईबाबत शुक्रवारी (ता. २७) विशेष बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार मांडेकर पुढे म्हणाले की, ‘‘शासकीय कार्यालयांत कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. कामात कुचराई करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी निकषात बसणाऱ्या पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी तातडीने सादर करावेत.’’
यावेळी कृषी विभागातर्फे विविध योजनांची माहिती देण्यात आली. हेमंत कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय ढमाळ यांनी आभार मानले.

प्रांगणातील बैठकीला प्रतिसाद
राजगड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच खरीप व पाणीटंचाई बैठक सभागृहात न घेता पंचायत समितीच्या प्रांगणात घेण्यात आली. यामुळे मोठ्या संख्येने नागरिक व सरपंचांना उपस्थित राहून आपले प्रश्न मांडता आले, ज्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com