दापोडे येथे ज्येष्ठाला शिवीगाळ, मारहाण

दापोडे येथे ज्येष्ठाला
शिवीगाळ, मारहाण
Published on

वेल्हे, ता. २२ : दापोडे (ता. राजगड) येथे एका ६० वर्षीय व्यक्तीला जातिवाचक शिवीगाळ करत लोखंडी पाईप व लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २०) रात्री उशिरा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी रोहिदास दामाजी कांबळे (वय ६०, रा. दापोडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना रविवारी (ता. १९) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या शेडमध्ये घडली. ते शेडमध्ये बसले असताना आरोपी लहू ज्ञानोबा शेंडकर, कृष्णा मरळ (पूर्ण नाव माहिती नाही), हरिभाऊ धरपाळे (पूर्ण नाव माहिती नाही) व एक अनोळखी साथीदार यांनी अनधिकृतपणे शेडमध्ये प्रवेश करून त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र फिर्यादींनी नकार दिल्याने आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, एका आरोपीने लोखंडी पाईपने व दुसऱ्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी मुख्य आरोपी लहू शेंडकर याने जातिवाचक शिवीगाळ केली. या मारहाणीमध्ये कांबळे यांना गंभीर दुखापत झाली. आरोपींनी, ‘पैसे दिले नाहीत तर जीव घेऊ,’ अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com