

वेल्हे, ता. २४ : राजगड तालुक्यातील किल्ले तोरणा गडाच्या परिसरात तसेच पानशेत धरण खोऱ्यात शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार वादळी पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाल्याचे नागरिकांनी सांगितले. तर तोरणा गडाच्या पायथ्याच्या वेल्हे बुद्रुक येथे वीज कोसळून शेतकरी विलास विठ्ठल गायकवाड यांची दोन जनावरांचा मृत्यू झाला.
गायकवाड यांच्या घरासमोरील अंगणात जनावरे बांधली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजेचा मोठा लोळ झाडावर कोसळला. तेथे असलेली एक गाय व एक बैल जागीच ठार झाली. गायकवाड मुलाबाळांसह घरात शिरल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. दरम्यान, राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांच्या सूचनेनुसार पशुधन अधिकारी तसेच तलाठी यांनी घटनास्थळी जात तत्काळ संयुक्त पंचनामा केला असून यामध्ये शेतकरी गायकवाड यांचे सुमारे हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती उपसरपंच निखिल गायकवाड यांनी दिली दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.