Sun, Feb 5, 2023

बातमीचा जोड व फोटो... महावितरणचे अधिकारी ,कर्मचारी नॉट रिचेबल...
बातमीचा जोड व फोटो... महावितरणचे अधिकारी ,कर्मचारी नॉट रिचेबल...
Published on : 4 January 2023, 3:32 am
अधिकारी, कर्मचारी नॉट रिचेबल
महावितरण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वालचंदनगर परिमंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फोन बंद ठेवल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. यासंदर्भात वालचंदनगरमधील ज्येष्ठ नागरिक अतुल तेरखेडकर यांनी सांगितले की, दुपारी ४ नंतर संप मिटल्याच्या बातम्या टीव्हीवरती सुरु होत्या. आज दिवसभर वालचंदनगर, कळंब परिसरात लाइट नव्हती. अनेकांच्या घरात पाणी नव्हते. संप मिटल्यानंतर अधिकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता फोन नॉट रिचेबल असल्यामुळे नागरिकांच्या पुढील अडचणी वाढल्या असल्याचे सांगितले.