सम्राट अशोक चषकावर तांदूळवाडी संघाची मोहोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सम्राट अशोक चषकावर
तांदूळवाडी संघाची मोहोर
सम्राट अशोक चषकावर तांदूळवाडी संघाची मोहोर

सम्राट अशोक चषकावर तांदूळवाडी संघाची मोहोर

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. ५ : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे वालचंद हिराचंद यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सम्राट अशोक चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये तांदूळवाडी (ता. बारामती) येथील संघाने टेंभुर्णीच्या संघाचा १८ धावांनी पराभव करून सम्राट अशोक चषक पटकावला.

इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद सुनील साबळे यांनी वालचंद उद्योग समुहाचे संस्थापक वालचंद हिराचंद यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सम्राट अशोक चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील ३२ संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना तांदूळवाडी (ता. बारामती) विरुद्ध टेंभुर्णी (ता. सोलापूर) या संघांमध्ये झाला. यामध्ये तांदूळवाडी संघाने टेंभुर्णी संघाचा १८ धावांनी पराभव केला.

स्पर्धेचे उद्‍घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह चौधरी यांच्या हस्ते झाले. या वेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबा निंबाळकर, राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेश युवकाध्यक्ष रविराज खरात, वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड, वालचंदनगर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ, नवनाथ धांडोरे, रोहित गायकवाड, पोपट मिसाळ, शैलेश फडतरे, प्रशांत पवार, महेश बोंद्रे आदी उपस्थित होते. स्पर्धेला वालचंदनगरचे पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष निवास शेळके, हर्षवर्धन गायकवाड, रोहित झेंडे, गणेश धांडोरे, शेखर काटे, आकाश भोसले, संदीप भोसले, विजय चितारे यांनी हजेरी लावली.

स्पर्धेतील विजेते संघ
प्रथम - तांदूळवाडी संघ, द्वितीय - टेंभुर्णी संघ, तृतीय - मुळशी संघ, चतुर्थ - इंदापूर संघ