Mon, Jan 30, 2023

भवानीनगरमध्ये मटक्याच्या अड्यावर छापा
भवानीनगरमध्ये मटक्याच्या अड्यावर छापा
Published on : 15 January 2023, 2:45 am
वालचंदनगर, ता. १५ ः भवानीनगर (ता. इंदापूर) येथे मटक्याच्या अड्यावर छापा टाकून वालचंदनगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पोलिसांनी संतोष भिवा जाधव (वय ४० वर्षे, रा. निंबोडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १४) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भवानीनगर जवळील गायकवाड वस्तीकडे जाणाऱ्या दुकानाच्या बाजूला बेकायदेशीर मटक्याचा अड्डा सुरु होता. पोलिसांनी छापा टाकून १ हजार ३३२ रुपयांच्या रोख रक्कमेसह आकडेमोड केलेली कागदे जप्त केली. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून तपास पोलिस हवालदार गुलाब पाटील करीत आहेत.