लाचखोर हवालदारावर जंक्शनमध्ये कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाचखोर हवालदारावर
जंक्शनमध्ये कारवाई
लाचखोर हवालदारावर जंक्शनमध्ये कारवाई

लाचखोर हवालदारावर जंक्शनमध्ये कारवाई

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. २८ : जंक्शन (ता. इंदापूर) येथे वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हवालदाराला १० हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले.
याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार पोलिस हवालदार मोहन मल्हारी ठोंबरे (वय ५६ वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळसमधील एका युवकावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामध्ये युवकावर कारवाई न करण्यासाठी हवालदार ठोंबरे यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी (ता. २७) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जंक्शनमध्ये १० हजार रुपयांची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा टाकून ठोंबरे यांच्यावर कारवाई केली. याबाबतचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निंबाळकर पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर हे करत आहेत.