इंदापूरच्या राजकारणात रंगणार 
निधीच्या श्रेयवादाची लढाई

इंदापूरच्या राजकारणात रंगणार निधीच्या श्रेयवादाची लढाई

Published on

राजकुमार थोरात : सकाळ वृत्तसेवा
वालचंदनगर, ता. ३ : अजित पवार यांनी भाजपच्या मदतीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचा परिणाम इंदापूरच्या राजकारणावर होणार असून, कट्टर विरोधक आमदार दत्तात्रेय भरणे व भाजपचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये विकासकामांची चढाओढ सुरू होणार असून, चुरशीचे राजकारण वाढणार आहे. निधीच्या श्रेयवादाची लढाई रंगणार आहे.
इंदापूरच्या राजकारणाची राज्यात चर्चा होते. तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपमध्ये चुरशीचे राजकारण सुरु आहे. दोन्ही पक्षाचे नेते व पदाधिकारी एकमेकांना सातत्याने आव्हान देत असतात. तसेच, तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून लोकसभेच्या निवडणुका भाजप व राष्ट्रवादीमध्ये चुरशीच्या होत आहेत. सध्या तालुक्यामध्ये भरणे व पाटील यांच्यामध्ये विकासकामांच्या निधीवरून चुरस आहे. तसेच, निधीच्या श्रेयावरून दावे-प्रतिदावे सुरु आहेत. दोघेही सातत्याने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असतात. अजित पवार हे भाजपसोबत गेल्याचा परिणाम इंदापूर तालुक्याच्या राजकारणावर होणार आहे. आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये आलेल्या निधीवरून श्रेयवादाची लढाई सुरु राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.