जिल्हा परिषदेच्या शाळेतील पोरं हुश्‍शार!

जिल्हा परिषदेच्या शाळेतील पोरं हुश्‍शार!

Published on

वालचंदनगर, ता. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून इंदापूर तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांनी पीएसआय होण्याचा बहुमान मिळविला आहे. यातील पाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरवात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधून मराठीमधून झाली. स्पर्धा परीक्षेच्या यशाचे गमक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत.
खोरोची येथील अजयसिंह भाळे यांचे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तसेच, पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण निरवांगीमधील पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. तावशीमधील करिष्मा वणवे हिचे पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले असून, पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमिक विद्यालयात झाले. निरवांगीमधील रणधीर रोकडे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये; तर माध्यमिक शिक्षण गावातीलच माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. काटीच्या ज्योती शिंदे चे पहिली ते चौथी व माध्यमिकचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या व माध्यमिक काटेश्‍वर विद्यालयामध्ये झाले. पळसदेवच्या अभिजित दत्तात्रेय ढेरे याचे प्राथमिक व माध्‍यमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये व पळसनाथ विद्यालयामध्ये झाले. तर, अक्षय शिंदे याचे शिक्षण वालचंदनगरमधील इंग्रजी माध्यमाच्या भारत चिल्ड्रेन्स अॅकडमीमध्ये झाले.
स्पर्धा परीक्षेच्या यशाचा मार्ग निश्‍चितच जिल्हा परिषदेच्या शाळेमधून जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.