तोफांच्या सलामीने इंदापुरात स्वागत

तोफांच्या सलामीने इंदापुरात स्वागत

Published on

वालचंदनगर, ता. ७ : जगत् गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीने इंदापूर तालुक्यामध्ये स्वागत करण्यात आले. रात्री मुक्कामासाठी पालखी सोहळा सणसर (ता. इंदापुरात) येथे विसावला.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने काटेवाडीच्या मेंढ्याच्या रिंगणानंतर बारामती तालुक्यातून इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश केला. भवानीनगरमध्ये पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पालखी रथाचे सारथ्य केले. भवानीनगर श्री छत्रपती हायस्कूल मुली पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी विठ्ठल, रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेषामध्ये आले होते. वाजत गाजत पालखी सोहळा छत्रपती कारखान्याच्या समोर विश्रांतीसाठी विसावला.
यावेळी भवानीनगर बाजारपेठ लाकडी-निंबोडी, सपकळवाडीमधील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली. छत्रपती कारखान्याच्या वतीने वारकऱ्यांना बुंदीचे वाटप करण्यात करण्यात आले. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, संचालक अॅड. रणजित निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, गणेश झगडे, कुंदन देवकाते, राजेंद्र गावडे, निवृत्ती सोनवणे, माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, सणसरचे सरपंच पार्थ निंबाळकर, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, संतोष चव्हाण यशवंत नरुटे उपस्थित होते.
दरम्यान, भवानीनगर येथे कारखान्याच्या कार्यस्थळावर राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पालखी सोहळ्याचे विश्वस्त भानुदास मोरे त्यांच्याबरोबर फुगडीचा खेळ रंगला होता.

रिमझिम पाउसात ज्ञानेश्‍वर-तुकारामांचा जयघोष
विसाव्यानंतर पालखी सोहळा सणसर गावामध्ये मार्गस्थ झाला. रिमझिम पावसामध्ये चिंब होऊन वारकरी ज्ञानेश्‍वर-तुकारामांचे जयघोष करीत सणसर गावामध्ये पोचले. सणसरमधील पालखी तळावर आरती झाल्यानंतर पालखी सोहळा रात्रीच्या मुक्कामासाठी विसावला. सणसर परीसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली


04360

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.