वालचंदनगर पोलिसांचे अवैध धंद्यांवर छापे

वालचंदनगर पोलिसांचे अवैध धंद्यांवर छापे
Published on

वालचंदनगर, ता. ३ : इंदापूर तालुक्यातील लासुर्णे, अंथुर्णे, कळंब, वालचंदनगर, घोलपवाडी, बोरी, कळस, शेळगाव, गोतोंडी येथील अवैध धंद्यावर वालचंदनगर पोलिसांनी छापे टाकून गुन्हे दाखल केले.
वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे. बुधवारी (ता. २) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास लासुर्णे गावच्या हद्दीतील चिखली फाटा येथे छापा टाकून गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या मंगल पोपट सवाणे (वय ६५, रा. चिखली फाटा, लासुर्णे) यांच्यावर गुन्हा दाखल करून एक हजार रुपये किमतीची २० लिटर दारू जप्त केली.
शेळगावमध्ये बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री करणाऱ्या छापा टाकून अक्षय भारत शिंगाडे (वय २१ रा.शेळगाव) याच्यावर गुन्हा दाखल करून १३५६ रुपयांची दारू जप्त केली. कळंबमध्ये देशी दारू विक्री करणाऱ्या विजय तायाप्पा सावंत (वय ५८ रा. कळंब, लालपुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करून ९८० रुपयांची देशी दारू जप्त केली. वालचंदनगरमधील लोहारवस्ती येथे छापा टाकून विजय राजू चितारे (वय ३५, रा. वालचंदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करून ९३५ रुपयांची देशी दारू जप्त केली. घोलपवाडी येथे छापा टाकून देविदास दत्तात्रेय जाधव (वय ३०, रा. घोलपवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करुण ५०० रुपये किमतीची १० लिटर गावठी हातभट्टीचे दारू जप्त केली. कळंबमध्ये छापा टाकून देशी दारू विक्री करणाऱ्या विजय लक्ष्मण चव्हाण (वय ५२, रा. कळंब) याच्यावर गुन्हा दाखल करून ३४४० रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली.
बोरीमध्ये छापा टाकून सुजाता संतोष कुचेकर (रा. बोरी) यांच्याकडून ९२० रुपयांची देशी दारू जप्त केली. तसेच, येथे दुसरा छापा टाकून सतीश शंकर पवार यांच्याकडून ६८० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. कळसमध्ये छापा टाकून अलका संभाजी माळवे (वय ६५) यांच्यावर गुन्हा दाखल करून १३७० रुपयांची देशी दारूच्या बाटल्या व हातभट्टी दारू जप्त केली. अंथुर्णे येथे छापा टाकून किरण दुर्योधन खवळे (वय २८, रा. अंथुर्णे) याच्याकडून ६०० रुपयांची हातभट्टीची दारू जप्त केली. ५४ फाटा येथे छापा टाकून दिगंबर आकाश पंडगे (वय २१) याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांची देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com