आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन सावकारावर गुन्हा

आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन सावकारावर गुन्हा
Published on

वालचंदनगर, ता. ३ : सणसर (ता.इंदापूर) येथील युवकाला आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दोन खासगी सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तानाजी पुंडलिक सपकळ व पुंडलिक सपकळ (रा. हिंगणेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमध्ये दत्तात्रेय मारुती नरे (वय ४५,रा. काळेवस्ती, सणसर) या युवकाने २६ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सुमन दत्तात्रेय नरे ( वय ३६) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रेय नरे यांनी ३० तोळे सोन्याचे दागिने एका सराफाच्या दुकानामध्ये गहाण ठेवले होते. ते सोडविण्यासाठी सपकळ यांनी १२ लाख ५४ हजार रुपये नरे यांना व्याजाने दिले होते. दागिने सोडविल्यानंतर सपकळ यांनी दागिने स्वत:कडे ठेवले. तसेच व्याज व मुद्दलीच्या बदल्यामध्ये नरे यांनी सपकळ यांना २१ लाख परत दिले होते. तसेच नरे यांच्याकडून पैशाच्या बदल्यामध्ये बारली पशुखाद्य घेऊन जात होते. सराफाच्या दुकानातून सोडवलेले ३० तोळे दागिने ही परत न करता नरे यांना ३० जानेवारी २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मुद्दल व व्याजाचा मोबदला मिळावा म्हणून तगादा लावून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने दत्तात्रेय नरे यांनी २६ नोव्हेंबर रोजी त्रासाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येपूर्वी नरे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सपकळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com