तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक

तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक
Published on

वालचंदनगर, ता. १३ : आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत दोन युवकांची ७ लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली आहे.
याप्रकरणी तौसिम इब्राहिम मणियार (वय ३३, रा. बारामती, मुळ रा. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर) याला अटक केली आहे. याप्रकरणी करण अनिल तनपुरे (वय २३, रा. शिरसटवाडी) या युवकाने वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जुलै २०२१ ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये मणियार याने शिरसटवाडीमधील अनिल तनपुरे याला आरोग्य सेवक, तसेच राज्य उत्पादन शुल्क, महसुल खात्यामध्येही विभागामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून २ लाख ७१ हजार ५०० रुपये घेऊन फसवणूक केली. मणियार याने अनिल तनपुरे याला केंद्र सरकारच्या महसुल विभागातील उत्पादन शुल्क विभागातील बनावट नियुक्ती पत्र देवून मुंबई कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितले होते. मात्र तनपुरे याला संशय आल्याने त्याने चौकशी केली असता बनावट नियुक्तीपत्र असल्याचे लक्षात आले. तसेच अक्षय बाळासाहेब कदम यालाही पोलिस शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी पोलिसांनी तौसिम इब्राहिम मणियार (वय ३३) याला अटक केली आहे. त्याला इंदापूर न्यायालयामध्ये हजर केले असता १७ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय टिळकीकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com