निर्दोष मतदार यादी ठेवून निवडणुका घ्या : जाचक

निर्दोष मतदार यादी ठेवून 
निवडणुका घ्या : जाचक
Published on

वालचंदनगर, ता. ४ : निर्दोष मतदार यादी समोर ठेऊन निवडणुका घेण्याचे आवाहन छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाला दिले आहे.
जाचक यांनी सांगितले की, निर्दोष मतदार यादी हा सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा आत्मा असते. निवडणूकीमधून संस्थेचा कारभारी निवडला जात असतो. संस्थेचा कारभारी निर्दोष मतदार यादीतून निवडला गेला तरच संस्था जिवंत राहू शकते. अन्यथा ती संस्था मरणोन्मुख झाल्याशिवाय राहत नाही. याचाच प्रत्यय कित्येक संस्थेला आला आहे. छत्रपती कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळ व इच्छुकांमध्ये निर्दोष याद्या समोर ठेऊन निवडणुका घ्यायची हिंमत मंडळींमध्ये आहे का? नीरा खोऱ्यातील साखर पट्ट्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने बाहेर ऊस घालणाऱ्या सभासदांसाठी एक परिपत्रक काढून बाहेर गाळपासाठी जाणारा ऊस रोखला होता. असे परिपत्रक छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाने का काढले नाही?
संचालक मंडळाच्या निष्क्रिय कारभारावर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी प्रश्न उपस्थित केले तर आपण तोंडघशी पडू, या भीतीने संचालक मंडळाने गेली दोन वर्षे वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही. निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांनी निवडणूक लागण्यापूर्वी एकदा त्यांच्या नेतृत्वाच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा घेण्याचं धारिष्ट्य दाखवावे. सभेमध्ये तुमच्या कारभाराचा न्यायनिवाडा सभासद केल्याशिवाय राहणार नसल्याचे जाचक यांनी सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com