‘छत्रपती’साठी ३३९ अर्ज दाखल

‘छत्रपती’साठी 
३३९ अर्ज दाखल
Published on

वालचंदनगर, ता. ११ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आतापर्यंत ३३९ नागरिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये युती झाली आहे. अजित पवार यांनी जाचक यांच्याकडे कारखान्याची जबाबदारी दिली आहे. छत्रपती कारखान्याचे संचालक होण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढत चालली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चढाओढ सुरु आहे. शुक्रवारी (ता. ११) एकाच दिवसामध्ये विक्रमी २२१ नागरिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत ३३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com