भवानीनगरला चोरट्यांनी दोन सराफी दुकाने फोडली
वालचंदनगर, ता. २७ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथे दोन चोरट्यांनी भर पावसामध्ये धुमाकूळ घालून सोने व चांदीची दोन दुकाने फोडली आहेत. एका दुकानामधून चोरट्याने ५ लाख ८३ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. यामध्ये १ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचा समावेश आहे.
याप्रकरणी प्रसाद चंद्रकांत जाधव यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भवानीनगरमध्ये प्रसाद जाधव व किरण अरुण घोरपडे यांचे श्री ज्वेलर्स अॅन्ड सराफ नावाचे सोने चांदीचे दुकान आहे. सोमवारी (ता. २६) रात्रीच्या वेळी चोरट्याने सोने चांदीचे दुकानाच्या खिडकीचे गज कापून दुकानामध्ये आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील ४५.४०० ग्रॅम वजनाचे ३ लाख ३८ हजार रुपये किमतीची एक सोन्याची गोळी, २.१६० किलोग्रॅम वजनाचे १ लाख ४५ हजार ग्रॅम वजनाचे दागिने असून यामध्ये चांदीचे पैंजण, चांदीचे छल्ले चांदीचे गोफ, चांदीच्या चैन व लहान मुलांचे कमरेचे करदोडे व १ लाख रुपये रोख रक्कम असा ५ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. तसेच, चोरट्याने भवानीनगरमधील दुसरे ही सराफी दुकान फोडले. न यामध्ये चोरट्यांना काहीच मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

