वालचंदनगर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई

वालचंदनगर पोलिसांची 
अवैध धंद्यावर कारवाई
Published on

वालचंदनगर ता. ११ : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कळस, अंथुर्णे, कळंब व लाकडीमध्ये वालचंदनगर पोलिसांनी बेकायदेशीरपणे देशी दारू व गावठी हातभट्टी विकणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकून चौघांवर गुन्हे दाखल केले.
वालचंदनगर पोलिसांनी सोमवारी (ता. ९) कळस गावच्या हद्दीमध्ये दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास धनंजय नारायण मोहोळकर (वय ५२, रा. कळस) हे बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ११२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १६ बाटल्या जप्त करून कारवाई केली. साडेपाच वाजण्याच्या सुमारास कळंब गावच्या हद्दीमध्ये छापा टाकून छबूराव कुंडलिक भोसले (वय ४७, रा. सांधाचाळ, कळंब) यांच्यावर कारवाई करून देशी दारूच्या ९८० रुपयांच्या १४ बाटल्या जप्त केल्या. अंथुर्णे गावच्या हद्दीमध्ये छापा टाकून भागवत मारुती गायकवाड (वय ६५, रा. अंथुर्णे) यांच्यावर कारवाई करून ७०० रुपये किमतीची १० लिटर गावठी हातभट्टी जप्त केली. लाकडीमध्ये छापा टाकून
दादा ज्ञानदेव भिसे (वय ४६, रा. लाकडी) यांच्यावर कारवाई करून ५६० रुपये किमतीची देशी दारूच्या १६ बाटल्या जप्त केल्या. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com