गाळपासाठी ३४ हजार एकर उसाची नोंद

गाळपासाठी ३४ हजार एकर उसाची नोंद

Published on

वालचंदनगर, ता. ७ : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडे २०२५-२६ च्या गळीत हंगामामध्ये ३४ हजार ४८ एकरमधील ऊस गाळपासासाठी उपलब्ध आहे. कारखान्याने १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिली.

भवानीनगर (ता.इंदापूर) छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी तयारी सुरू आहे. कारखान्याच्या दोन्ही युनिटच्या मिल रोलरचे पूजन सोमवारी (ता.७) संचालक सतीश देवकाते व रामचंद्र निंबाळकर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष कैलास गावडे, कारखान्याचे संचालक, अॅड. शरद जामदार, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपत कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठल शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, हनुमंत करवर, महादेव निकम, अण्णासाहेब कदम, जालिंदर शिंदे, युवराज रणवरे उपस्थित होते.

यावेळी जाचक यांनी सांगितले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आडसाली ऊस १२ हजार १८४ एकर, पूर्व हंगामी ऊस १८०० एकर, सुरू २८०० एकर व खोडवा सात हजार ७५० एकर तर कार्यक्षेत्राबाहेरील नऊ हजार ५१४ एकर असा ३४ हजार ४८ एकर उसाची कारखान्याकडे नोंद झालेली आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. आत्तापर्यंत ३१५ ट्रॅक्टर, ६२५ ट्रॅक्टर गाडी , ९६८ बैलगाडीचे व १० हार्वेस्टरचे करार झाले आहेत. गळीत हंगाम वेळेत सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील मशिनरी ओव्हरहॉलिंग व रिपेअरिंगची कामे वेगाने चालू आहेत. दोन्ही युनिट ऑक्टोबरच्या दरम्यान गाळपासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत.


छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता वाढावी यासाठी ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचह योजना राबविण्यात येत आहे. खताची व पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून या योजनेमध्ये सुरुवातीला ६०० सभासदांना सहभाग घेता येणार असून, १५ जुलैपर्यंत इच्छुक सभासदांनी नोंद करण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष जाचक व उपाध्यक्ष गावडे यांनी केले.

05296

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com